Kiran Sarnaik | विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांच्या गाडीचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात शुक्रवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. कारमधून किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांचा भाऊ, पुतण्या, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचे चक्काचूर झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृतांची ओळख
वाशिम रोडवर दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या अपघातात किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईक (२८) याचा मृत्यू झाला आहे. शिवाजी आमले (वय ३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५) आणि नऊ महिन्यांच्या बाळासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हे लोक गंभीर जखमी झाले
या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये पियुष देशमुख (वय 11), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अपघाताची माहिती तातडीने रुग्णवाहिका व पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरनाईक यांनी 2020 मध्ये अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. अपक्ष आमदार झाल्यापासून त्यांनी आता एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल