KKR In IPL Final | आयपीएल फायनलमध्ये पोहोचल्यानंतर केकेआरच्या कर्णधाराला आनंद गगनात मावेना, म्हणाला…

KKR In IPL Final | नरेंद्र मोदी स्टेडियम येथे काल झालेल्या पहिल्या क्वलिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैद्राबाद संघावर ८ विकेट्सनी शानदार विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने आयपीएल च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

अंतिम फेरी गाठल्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर च्या आनंद गगनात मावेनासा (KKR In IPL Final) झाला आहे. फायनलमध्ये पोहचल्यानंतर श्रेयस अय्यर आनंदात होता. तो म्हणाला की, हैदराबादविरोधात मिळालेला विजय आनंदित करणारा आहे. प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावली. प्रत्येकजण जबाबदारीने खेळला. तुम्ही वेगवेगळ्या राज्यात प्रवास करता तेव्हा सातत्य राखणं सोपं नसतं. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आम्ही कोणीही गोष्टी हलक्यात घेत नाही, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहेत.

गुरबाज आला आणि त्याने आमच्यासाठी प्रभावी सुरुवात केली, सुनील नारायण याने वेगवान फलंदाजी केली. माझ्यात आणि व्यंकटेशमध्ये फरक एवढाच आहे की मी तमिळ बोलत नाही (पण समजतो). तो माझ्याशी तमिळमध्ये बोलतो. या क्षणाचा आनंद लुटण्याची आणि अंतिम फेरीसाठी झोनमध्ये येण्याची आशा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप