Delhi News | घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा कारने चिरडल्याने जागीच मृत्यू – video

Delhi News | दिल्लीतील गीता कॉलनीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेचा घराबाहेर कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. जो वेगाने व्हायरल होत आहे.

गाडीचा वेग अचानक वाढला
व्हिडीओमध्ये ती महिला आरामात झाडू मारत असल्याचे दिसून येते. काही वेळाने रस्त्यावर एक कार येते आणि अचानक तिचा वेग वाढतो. यानंतर कार महिलेला जोरदार धडकते आणि थांबते. कारचा वेग इतका जास्त होता की महिलेला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची संधीही मिळाली नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती उडून कार आणि भिंतीच्या मध्ये पडली. यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला
मात्र, कारच्या मागच्या सीटवर बसलेली मुलगी बाहेर येते आणि महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, असेही व्हिडिओमध्ये दिसत होते. मग ती ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगते. ड्रायव्हर गाडी मागे घेतो आणि महिलेला बाहेर काढतो, पण खूप उशीर झालेला असतो. तेवढ्यात आणखी काही लोक तिथे येतात. या भीषण धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 55 वर्षांची होती. याप्रकरणी गीता कॉलनी (Delhi News) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई