Kuwait Fire | मजूर राहत असलेल्या सहा मजली इमारतीला आग; 41 जण मृत्युमुखी

Kuwait Fire | कुवेतमधल्या मंगाफ शहरात मजूर निवासासाठी असलेल्या सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत काल, चाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री कीर्तिवर्धन सिंग यांना कुवेतमध्ये  (Kuwait Fire)जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही देह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणं अशक्य असल्याचं सिंग यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी सांगितलं. पंतप्रधानांनी काल एका बैठकीत या घटनेचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत भारतानं जाहीर केली आहे.

जखमींना 5 सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल असून बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असल्याचही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल आहे .दरम्यान कुवेत मधील भारताचे राजदूत आदर्श स्वाईक यांनी दुर्घटना स्थळाला तसच भारतीय जखमी नागरिक दाखल असलेल्या रुग्णालयांना भेट दिली. तसच त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क आणि समन्वय करत असल्याची माहिती दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप