Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान

Pakistani Singer Atif Aslam : पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमने (Atif Aslam) अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये गाणी गायली नाहीत. मात्र पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यापूर्वी ‘टायगर जिंदा है’मधील आतिफने गायलेले ‘दिल दियां गल्लन’ हे गाणे आजही लोकांच्या पसंतीस उतरले आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘कलयुग’ चित्रपटातील ‘आदत’ या गाण्यात आतिफचा आवाज पहिल्यांदा ऐकणाऱ्या बॉलिवूड चाहत्यांना त्याचा आवाज नेहमीच खूप आवडला आहे. आता आतिफच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतात त्याचे शेवटचे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर जवळपास 7 वर्षांनी आतिफ आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. बॉलिवूड चित्रपट ‘लव्ह स्टोरी ऑफ 90’ (LSO90’s) चे निर्माते आतिफसोबत त्यांच्या नवीन चित्रपटासाठी सहकार्य करणार आहेत. दिग्दर्शक अमित कसारिया यांच्या या चित्रपटात अध्यायन सुमन आणि मिस युनिव्हर्स दीवा, दिविता राय प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र पाकिस्तानी कलाकारांविरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॉलिवूडच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्सवरून बॉलिवूडला इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांनी एक्सवर म्हटलं, अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.

अमेय खोपकर यांनी इशारा दिल्याने आता अरिजीत सिंग काय भूमिका घेतो, हे गाणं गाण्यापासून अतिफ अस्लमला अडवलं जातं का? हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा