विधान परिषद निवडणुक : महाविकास आघाडीचा दारूण पराभव; बावनकुळे- खंडेलवाल यांचा दणदणीत विजय

नागपूर – राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा अतिशय दारूण पराभव झाला आहे. नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदार संघातून भाजपचेच वसंत खंडेलवाल यांनी मोठा विजय मिळवला आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. महाविकास आघाडीने पूर्ण ताकत लाऊन देखील भाजपने या ठिकाणी दैदिप्यमान विजय मिळवला आहे.

दुसरीकडे विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली होती मात्र या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बाबनकुळे यांनी सर्वाना धोबीपछाड देत मोठा विजय मिळवला आहे.