मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

Sameer Bhujbal- मराठी माणूस (Marathi Manus) या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे अशी भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले तरी मराठी भाषिक वर्ग जास्त आहे. या शहरात आजवर कोणत्याही जाती-धर्मात भेदभाव झालेला नाही तो यापुढेही होता कामा नये असे मतही समीर भुजबळ यांनी माध्यमांसमोर मांडले.

माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे खंडन करत रमेश कदम हे केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी होणाऱ्या बैठकीतून निश्चित मार्ग निघेल असा विश्वास करतानाच सर्व राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षा समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी पुढील आठवड्यापासून विभागवार बैठकांचे आयोजन करून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष अशा रिक्त पदांची नियुक्ती करण्यात येईल. मुंबईत सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभी केली जाणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा