Ashish Shelar | प्रत्येक राष्ट्रभक्ताचं मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे, आशिष शेलारांचे आवाहन

Ashish Shelar | इंडिया आघाडीकडून एक नवीन पद्धतीचा जिहाद सुरू झाला आहे. पूर्वी आपण लँड जिहाद पाहिला, लव जिहाद, भाषा जिहाद बघितला आता वोट जिहाद मुंबईत मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. या वोट जिहादचा प्रमुख आका कोण असेल तर ते उद्धव ठाकरे ( uddhav thackeray) आहेत अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

अश्या देशविरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचं मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे असेही आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केले.

दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. महायुतीच्या महाविजयासाठी एकजुटीने काम करण्याचे तसेच मोदी सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन लोकांमध्ये जाऊन दमदार प्रचार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी कॅबिनेट मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा, महामंत्री संजय उपाध्याय, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आम्ही कुठल्या धर्माच्या भाषेच्या विरोधात नाही. १९५० ते २०१४ पर्यंत बहुतांश काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळात जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढते तेव्हा हिंदुंची संख्या ७.८ टक्क्यांनी कमी होते. यासाठी वोट जिहादच्या विरोधात लढताना आपल्याला आपले राष्ट्र टिकवायचे आहे. आपला हिंदुस्तान ताठ मानेने उभा करायचा आहे. हिंदू एकत्र आला तर यांना त्रास होतो त्यामुळे हिंदू विरोधी सर्वजण एकत्र आले आहेत. गेले दोन ते तीन दिवस मराठी आणि गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मराठी आणि गुजराती बांधव दुधात साखर याप्रमाणे मुंबईत राहत आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान भाजप होवू देणार नाही आणि गुजराती माणसांवर अन्यायही चालू देणार नाही असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती