Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Vijay Thalapathy : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने (Vijay Thalapathy) राजकारणात प्रवेश केला आहे. थलपथी विजयने शुक्रवारी त्याच्या पक्षाची घोषणा केली, ज्याचे नाव ‘तमिझगा वेत्री कळघम’ आहे. तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार थलपथी विजयने सांगितले की, त्याच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे आणि त्याचा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवेल.

अधिकृत निवेदनात अभिनेता विजय म्हणाला, ‘पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे. मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला न लढण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.’

अभिनेते विजयने एका निवेदनात म्हटले आहे की, राजकारण हा व्यवसाय नसून ‘पवित्र जनसेवा’ आहे. ‘तमिझगा वेत्री कळघम’ चा शाब्दिक अर्थ ‘तमिळनाडू विजय पक्ष’ असा आहे. नुकत्याच झालेल्या महापरिषद आणि कार्यकारिणीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आल्याने त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे विजय म्हणाला. तो म्हणाला, ‘पक्षाच्या कामावर कोणताही परिणाम न करता मी आधीच बांधील असलेला चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.’ जनसेवेच्या राजकारणात स्वत:ला झोकून देणार असल्याचे विजय सांगतात. तसेच विजयने तामिळनाडूच्या जनतेचे आभारही मानले.

विजयच्या या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. अभिनेता राजकारणात येण्याची शक्यता काही काळ वर्तवली जात होती. तामिळनाडूमध्ये यापूर्वी अनेकांनी अभिनयाच्या दुनियेतून राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे एम.जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता आहेत.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा