स्वबळावर शिवसेनेचा भगवा फडकु दे;  शिवसैनिक, युवा सैनिकांचे कमलाभवानी मातेला साकडे 

करमाळा –  महाराष्ट्राच्या विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकवून शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होवुदे यासाठी करमाळा तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक यांनी करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवनी मातेस महाआरती करुन साकडे घातले.

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखालील भगवा सप्ताह कार्यक्रम सुरु असुन आज वर्धापनदिनानिमित्त युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या हस्ते कमलाभवनी मातेस महाआरती करण्यात आली. तसेच कमलाभवनी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.  यावेळी आई कमलाभवानी ची ओटी महिला आघाडीच्या  वर्षाताई चव्हाण,आशाताई काळे, प्रियांकाताई गायकवाड यांच्या  हस्ते भरण्यात आली.

या वेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहु फरतडे ,तालुकाप्रमुख सुधाकर लावंड , शहर प्रमुख प्रवीण कटारीया महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण,  केम शहर महिला आघाडी प्रमुख आशा काळे ,उपतालुकाप्रमुख श्रिहरी तळेकर, प्रमोद वागज, बंडु शिंदे, भिवाजी शेजाळ, गौंडरेचे माजी उपसरपंच शाखा प्रमुख उत्तम हनपुडे, माजी उपसरपंच,आळसुंदेचे माजी उपसरपंच जोतीराम घाडगे,युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड ,राहुल कानगुडे  भाऊ मस्तुद, दिगंबर काटुळे, बाळासाहेब शिंदे, बिरू ठोंबरे अभिम्यु लोकरे उपस्थित होते.