आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको, उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा दाखला देत सूचक इशारा

मुंबई – शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केले . यावेळी विधान परिषद निवडणुकीवर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. असं ते म्हणाले.

कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय. नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय.

आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले. मला राज्य पाहिजे पण कारभार जमणार नसेल तर तुम्ही नालायक.असं देखील ते म्हणाले.