… म्हणून मी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही – राजेंद्र पवार

बारामती – कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार(Punjabrao Deshmukh Krishi Ratna Award) वितरण सोहळ्याला राजेंद्र पवार (Rajendra Pawar) अनुपस्थित राहिले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आपण राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितलं.

2019 चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला होता. आज (2 मे) त्याच पुरस्काराचं वितरण नाशिकमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडत आहे. राज्यपालांच्या हस्ते आज हे पुरस्कार वितरीत होणार असल्यामुळे राजेंद्र पवार अनुपस्थित राहिले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं नव्हतं. त्यामुळे 198 पुरस्कारांचे वितरण आज पार पडत आहे. आज 2017 ते 2019 या वर्षांचे पुरस्कार वितरण होत आहे. 2017 मधील 64 शेतकरी, 2018 मधील 64 आणि 2019 मधील 70 पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.