समंथासोबत घटस्फोटानंतर पुन्हा एकदा संसार थाटण्यास सज्ज आहे नागा चैतन्य? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आपल्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. नागा चैतन्य 2021 मध्ये त्याची माजी पत्नी साऊथची सुंदर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu) वेगळा झाला होता. यानंतर नागा आणि शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या, ज्या ऐकून त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मात्र, या वृत्तांवर दोघांनीही अद्याप मौन सोडलेले नाही. आता पुन्हा एकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नागा एका रेस्टॉरंटमध्ये असून शेफसोबत पोज देत आहे. त्याचवेळी त्याची कथित प्रेयसी शोभिता धुलिपाला देखील त्यांच्या मागे टेबलवर बसलेली दिसत आहे. फोटोत शोभिताने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण लग्नाच्या काही वर्षानंतरच नागा आणि समंथा यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. घटस्फोटानंतर, समंथा कामात पूर्णपणे व्यस्त झाली आणि अजूनही अविवाहित आहे. दुसरीकडे नागा चैतन्यचे नाव सतत शोभिता धुलिपालासोबत जोडले जात आहे. या फोटोंमुळे ही अफवा बर्‍याच अंशी खरी असल्याचे दिसून आले आहे. आता नागा या नात्यावर आपले मौन कधी मोडतो आणि शोभिता धुलिपालासोबतचे नाते कधी स्वीकारतो? हे पाहावे लागेल.