गिरीष बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत दुःखाचे अश्रू कमी पश्चातापाचे जास्त वाटत होते – चव्हाण

Pune – पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं निधन झाले. गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे. राज्याच्या राजकारणातील गेल्या पाच दशकातला मोठा जनाधार असलेला भाजपाचा दमदार नेता हरपला. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. पुणे शहर व पुणे जिल्ह्यात भाजपचे मजबुत व ताकदवान संघटन उभे करणारे असे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

बापट यांना अखेरचा निरोप देताना पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांना, तसंच उपस्थित असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नव्हे तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे हे देखील भावूक झाल्याचं दिसून आलं.

एका बाजूला बापट यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षातून हळहळ व्यक्त केली जात असताना काही नेते मात्र अतिशय असंवेदनशीलपणे वागत असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर या दुखद प्रसंगी देखील राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) टीका केली आहे. गिरीष जी बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत दुःखाचे अश्रू कमी पश्चातापाचे जास्त वाटत होते. असा जावईशोध या महाशयांनी लावला.

 

खरतर या दुखःद प्रसंगी या महाशयांना टीका-टिपण्णी करणे टाळणे शक्य होते. मात्र आता एखाद्या नेत्याला राजकारणच करायचे असेल तर त्याला कोण रोखणार? राष्ट्रवादी पक्ष एका बाजूला सुसंस्कृत राजकारणाचा टेंभा मिरवत असतो मात्र दुसऱ्या बाजूला अशी उथळ राजकीय वक्तव्ये करून आपलं खरे रूप तर दाखवत नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो.