Muralidhar Mohol | शहरांच्या विकासाचा विचार करणारे मोदी पहिले पंतप्रधान, मुरलीअण्णांच्या प्रचार सभेत फडणवीसांचे गौरवोद्गार

Muralidhar Mohol | आपल्याकडे शहरांचा विचार आजपर्यंत कोणीच केला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शहरांच्या विकासाचा विचार केला. 2014 साली मोदींनी अमृत, स्मार्ट सिटी सारख्या योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. येत्या काळात प्रत्येक गरिबाला, झोपडपट्टीवासियाला पक्के घर मोदीच्या माध्यमातून मिळणार आहे. मोदीनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 20,000 घरे पुण्यात दिली आहेत. यासोबतच पुणेकरांना येत्या वर्षा दीड वर्षात पिण्याच्या पाण्याची 24/7 योजना पूर्ण झाल्यानंतर 24 तास पिण्याचे पाणी मिळणार आहे. पुणे शहरातील घनकचऱ्याच्या नियोजनासाठी मोदींनी मदत केल्यामुळे नदी नाल्यांचे होणारे प्रदूषण आपण संपवत चाललो आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे लोकसभा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पर्वती, पुणे येथे भाजपाची जाहीर सभा झाली. येथे ते बोलत होते. या सभेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, मकरंद देशपांडे, दत्ता गायकवाड, गणेश बिडकर, बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, परशुराम वाडेकर, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, मयुरी कोकाटे, लहु बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहीर सभेत उपस्थित जनसमूहास संबोधित करताना फडणवीस पुढे म्हणाले, मोदींनी काय जादू केली 25 कोटी लोक गरीबी रेषेखाली आले. 20 कोटी लोकांना घरे, 50 कोटी लोकाना शौचालये, 60 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी, 80 कोटी लोकांना रेशन, पुढील पाच वर्षे रेशन देणार, 55 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजना, 63 कोटी लोकांना मुद््रा कर्ज, त्यात 50 टक्क्यांहून जास्त मुली आणि महिला आहेत, 20 लाखापर्यंतचे लोन आता देणार, 80 लाख बचतगटांना निधी दिला, 10 कोटी लखपती दिदी होतील, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना आणली, आधुनिक प्रशिक्षण दिले, ज्येष्ठ नागरिकांना सर्व उपचार मोफत केले, वयोश्री योजना आणली, दिव्यांगासाठी कृत्रिम पाय आणि हाताच्या फॅक्टरी भारतात उघडल्या, मोदीजींनी पहिल्यांदा शहराची काळजी केली, शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा आधी, गेल्या पन्नास वर्षांत सरकारने शिक्षण, आरोग्य,रोजगारासाठी आले पण राहायला जागा, पिण्याला पाणी नव्हते, सांडपाणी व्यवस्था नव्हती. घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी पुण्याला निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी मोदींनी निधी दिला. पुण्यात मेट्रो धावतेय. त्याचे नेटवर्क तयार होतय. प्रदूषण टाळले जातय, मेट्रोसह इलेक्टिक बस आल्या. सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आहेत. स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. मोदीजींच्या निधीतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे दिली. त्यामुळे सुनियोजित शहर तयार होईल.

2014 पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार यांच्या एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडुन देत नाही तर पुण्या करता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. बापट साहेबांनी चांगले काम केले. त्यांचे काम पुढे न्यायचे आहे.

कोविडमध्ये अवस्था बिकट होती. 140 कोटी भारतात 40 ते 50 लोक मरतील असे जगातले लोक म्हणायचे. काही देश भारत आपल्याकडे व्हॅक्सिनसाठी येईल म्हणून वाट पाहात होते. मोदींनी शास्त्रज्ञ एकत्र केले,रॉ मटेरियल दिले, परदेशातून आवश्यक घटक आणले, 140 कोटी लोकांना व्हॅक्सिन दिले. मॉरिशस सारख्या 100 देशांना लस दिली. जे म्हणतात नरेंद्र मोदी हा आमचा नेता आहे. आपले पंतप्रधान जागतिक नेते झाले आहेत. एक मजबूत भारत मोदीजींच्या मुळे झाला आहे. बॉम्बस्फोट आधी व्हायचे केवळ अमेरिकेत जावून पुरावे द्यायचे. मोदी पंतप्रधान झाल्यावर बॉम्बस्फोट झाले. आपण सर्जिकल स्टाईक केला. जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो. त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे. लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती