आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! कर्णधार रोहित संघाबाहेर

आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. तत्पूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे.  रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yavav) त्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करू शकतो. रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने विक्रमी पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईच्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मधील प्रत्येकी पाच विजेतेपद रोहितच्या नेतृत्वाखाली मिळाले आहेत.

आयपीएल 2023 फायनलच्या अवघ्या 9 दिवसांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2023च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) लंडनमधील ओव्हल स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. 7 जूनपासून ही फायनल सुरू होणार आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आयपीएलच्या काही सामन्यांसाठी फायनलच्या पार्श्वभूमीवर विश्रांती घेऊ शकतो. तो स्पर्धेतील काही सामन्यांतून बाहेर होऊ शकतो. मुंबई इंडियन्स रविवारी (2 एप्रिल) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या ब्लॉकबस्टर सामन्यातून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कर्णधार होऊ शकतो
रोहितने आयपीएलदरम्यान विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यास सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करू शकतो, असे याच अहवालात म्हटले आहे. किरॉन पोलार्डच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमारला ही संधी मिळू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या टी20 फलंदाजाची भारताच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती.