Nana Patole | भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको आहेत, नाना पटोलेंचा टोला

Nana Patole | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, भाजपा हा ओबीसीची नेतृत्वाची नेहमीच अवहेलना करते आला आहे. ओबीसी नेता भाजपाच्या सानिध्यात असेल तर त्याला टार्गेट केले जाणारच. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. याच छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले होते, त्यावेळी ते डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप