‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री “बसवलेले” आहेत… निर्णय पवार साहेबच घेतात…’

‘मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी (ST Workers)आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते योगेश चिले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आज एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरावर गेले चप्पल फेक करण्यासाठी… कारण त्यांनाही माहीत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री “बसवलेले” आहेत… निर्णय पवार साहेबच घेतात… “जाणता राजा” एकच… छत्रपती शिवाजी महाराज. बाकी घरावर पडलेल्या चपलांनी सिद्ध केलं आजचा “राजा जाणता” नाही… असं ते म्हणाले.