‘युवा सेना गांजाप्रमुख कडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, याला जयंती आणि स्मृतिदिन मधला फरक कळला नाही’

मुंबई  : युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Youth Sena chief and MLA Aditya Thackeray) यांना आपल्या आजोबांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचाच विसर पडला की काय…? असा प्रश्नं राजकिय वर्तुळात विचारला जातोय.  23 जानेवारी रोजी शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती  असते मात्र असे असतानाही युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा “स्मृतिदिन” असा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवेसनाप्रमुखांच्या नातवाला आजोबांची जयंती की स्मृती दिन असा संभ्रम कसा काय पडू शकतो असा प्रश्नं राजकिय वर्तुळात विचारला जातोय.

दरम्यान, काही वेळा नंतर आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर अकांऊटवरून ही पोस्ट डिलिट करण्यात आलीय. पण आधी पोस्ट केलेला फोटो मात्र सर्वत्र व्हायरल होतोय.यानंतर आदित्य ठाकरे आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी ती टीकेची संधी सोडली नाही. युवा सेना गांजाप्रमुख कडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, याला जयंती आणि स्मृतिदिन मधला फरक कळला नाही म्हणूनच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यातला फरक कळणार नाही. असं म्हणत राणे यांनी अतिशय पातळीसोडून टीका केली आहे.