रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या; अमोल मिटकरी यांची थेट पंकजा मुंडेंना ऑफर

जळगाव – गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे (Gopinath Munde, Eknath Khadse) यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना (rohini khadse) हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही (pankaja munde)पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे. जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

अमोल मिटकरी काय म्हणाले –

भाजपा (BJP) पक्ष गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईवरच वाढला आहे. पण ज्या पद्धतीने त्यांच्याच मुलीचा पराभव करत सूडाचं राजकारण केलं जात आहे. हे रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, पण पंकजा मुंडेंच्या आलं नाही. त्यांच्याही लवकर लक्षात आलं पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

राज्यपाल १२ आमदारांची यादी लवकरच मान्य करतील. पण त्या यादीत दुर्दैवाने पंकजा मुंडेंचं नाव नाही. म्हणजेच, आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पक्ष छाटले जातात. रोहिणी खडसेंना हे कळलं आणि त्या लगेच राष्ट्रवादीत (NCP) आल्या, आता पंकजा मुंडेंनाही याची जाणीव असेल. तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे बाजूला ठेवत आहे, हे ओळखणं गरजेचं आहे, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.