Piyush Goyal | मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची अधिक भरभराट होईल

Piyush Goyal | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची आणखी भरभराट होणार असल्याचे उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दहिसर येथील मेळाव्यात सांगितले.

दहिसर येथे हिरे उद्योगाचे प्रतिनिधी आणि कामगारांशी संवाद साधताना पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे सदस्य या नात्याने ते मुंबईतील उद्योगाची झपाट्याने प्रगती करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. हिरे आणि आभूषण क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सर्वोच्च प्राधान्य राहील. कौशल्य विकास करून कारागीर आणि कामगारांसाठी रोजगारनिर्मिती करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर आहे. येत्या काळातही यावर जोर देऊन विकास यात्रेत महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल. मुंबईसह इतर भागात हिरे आणि दागिन्यांच्या उत्पादन आणि व्यवसायांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा वाढत असल्याचे ते म्हणाले.

उद्योग क्षेत्रातील कामगारांना संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, आयुष्मान भारतने ५० कोटींहून अधिक लोकांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ दिला आहे. आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेत चार कोटी कुटुंबीयांना पक्की घरे देण्यात आली आहेत. पुढील पाच वर्षात आणखी तीन कोटी घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.

सध्या कच्च्या घरामध्ये किंवा झोपडपडीत राहणाऱ्यांना येत्या पाच वर्षात ते रहात असलेल्या ठिकाणीच पुनर्विकास करून पुनर्वसन केले जाईल. सर्व सुविधांनी युक्त असे घर प्रत्येकाला मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी हे मध्यमवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्यांना मतांच्या रूपाने आशीर्वाद द्या, असे आवाहनही पीयूष गोयल यांनी यावेळी केले. उत्तर मुंबईत जागतिक दर्जाचे रुग्णालय उभारण्यात येणार असून यासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोदार इंडस्ट्रीजचे अनिल पोदार आणि उमेश पोदार यांनी पीयूष गोयल यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. आमदार मनीषा चौधरी, माजी नगरसेवक जगदिश ओझा, योगिता पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय