Amol Kolhe | अमोल कोल्हे भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते, कुणी केला हा गौप्यस्फोट?

Amol Kolhe | शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) निवडणुकीचा प्रचार आता वेग घेत आहे. चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या महातदारसंघात आता राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय नेते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. एकमेकांवर आक्षेप घेत आहेत, तर सडकून टीका करत आहेत. खासदार शरद पवार गटाचे ‘अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपचे कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते’, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला आहे. प्रवीण दरेकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

“हा आरोप करताना शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शिरुर येथे आले होते”, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरेकरांच्या या आरोपानंतर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे.

‘प्रवीण दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, याचे सर्टिफिकेट दरेकरांनी दिले. आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असा एक नारा दिला जातो’, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय