Abasaheb Garware College | गरवारे महाविद्यालयात परीक्षा शुल्कात १०० टक्के फी वाढ, अभाविपचा आंदोलनाचा इशारा

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात (Abasaheb Garware College) सेमिस्टरच्या परीक्षा शुल्कात ८० ते १०० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कला आणि विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्कात ही वाढ करण्यात आलेली आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मागच्या सेमीस्टर पर्यंत ८९० रू. एवढे होते मात्र आता ते वाढवून १५५५० रू. एवढे करण्यात आले आहे. तसेच विज्ञान शाखेचे परीक्षा शुल्क ११०० रू. एवढे होते ते वाढवून आता १६०० रू. एवढे करण्यात आले आहे. त्यासोबतच बॅकलॉग चे एका विषयाचे शुल्क ३५० रू वरून थेट ७०० रू. करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध खेड्या पाड्यातून सर्व सामान्य विद्यार्थी पुणे शहरात शिक्षण घ्यायला येत असतो परंतु स्वायत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करण्याचे काम गरवारे महाविद्यालय प्रशासन करीत आहे. यापूर्वी देखील पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा शुल्कात अचानक वाढ करण्यात आलेली होती. अभविपने गरवारे महाविद्यालयाला (Abasaheb Garware College) दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलेला असून महाविद्यालयाने सर्व परीक्षांचे शुल्क पूर्ववत करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थी परिषदेने दिला आहे. सोबतच जोपर्यंत महाविद्यालय परीक्षा शुल्क कमी करत नाही तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरू नये असे आवाहन अभाविप ने केले आहे.

विद्यापीठाचे शुल्क थकविल्याने विद्यार्थ्यांना भुर्दंड ?
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व स्वायत्त महाविद्यालयांना १५ टक्के रक्कम ही विद्यापीठाला जमा करावी लागते परंतु गरवारे महाविद्यालयाने हा दंड काही वर्षांपासून गरवारे महाविद्यालयाने थकाविला असल्याने आता तो शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासन करीत असल्याचा संशय आहे.

महाविद्यालयात गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय गोंधळ आणि अस्थिरता
गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयात प्रशासनाचा गलथान कारभार सुरू आहे. एका डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांनी अंतर्गत गुण चुकीचे भरल्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. महाविद्यालयातील एका विभागाच्या विभाग प्रमुख पदासाठी दोन प्राध्यापकांमध्ये हमरी तुमरी होऊन तुफान भांडण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून विद्यार्थी गरवारे सारख्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायला येत असतो परंतु स्वायत्ततेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक अभाविप मुळीच सहन करणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा अभाविप डेक्कन नगर सह मंत्री नवनाथ कावळे यांनी दिला आहे.

स्वयत्ततेचे रूपांतर स्वैराचारात होऊ देणार नाही. महाविद्यालयाच्या प्रशासनात कमालीचा गोंधळ निदर्शनास येतो आहे. विद्यार्थी विरोधी कारभार कदापि सहन केल्या जाणार नाही, असेही अभाविप गरवारे महाविद्यालय शाखेचे अध्यक्ष निखिल कुंदे यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?