न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Point Table: बंगळुरूमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सामना झाला. पावसामुळे न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. पाकिस्तानच्या या विजयामुळे गुणतालिकेत खळबळ उडाली आहे. या विजयासह पाकिस्तान पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. नशिबाने पाकिस्तानला साथ दिली आणि त्यांनी सामना जिंकला. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या न्यूझीलंडच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने 8 पैकी 4 सामने जिंकले असून 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका पात्र ठरली
त्याचबरोबर पाकिस्तानने 8 पैकी चार सामने जिंकले असून 8 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचा निकाल आल्यावर त्यांच्या स्थितीत बदल होईल. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर असून पाकिस्तानच्या या विजयासह ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

दोन जागांसाठी चार संघ लढतील
ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतही दोन्ही संघ कायम आहेत. पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. सेमीफायनलची लढत रंजक बनली आहे. आता चार संघ दोनच जागेसाठी आपसात लढतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानचा खेळ बिघडला, सेमी फायनलची शर्यत बनली आणखी मनोरंजक

Video: Urfi Javed ला मुंबई पोलिसांकडून अटक? तोकडे कपडे घातल्याने रस्त्यावरुनच उचललं

दिवाळीला सोने विकत घेताना ‘या’ गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!