Sunil Tatkare | अल्पसंख्याक समाजामध्ये व्हॉटसअपच्या माध्यमातून विखार पसरवला जातोय

Sunil Tatkare | ३७० कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उठवले आणि जम्मू -काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये व्हॉटसअपच्या माध्यमातून विखार पसरवला जातोय. संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे ( Sunil Tatkare) यांनी गुहागर शहरातील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत केला.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींची लाट असताना माझा निसटता पराभव झाला परंतु लोकांच्या प्रवाहापासून कधी दूर गेलो नाही आणि त्याचे २०१९ मध्ये फलित मिळाले असेही सुनिल तटकरे म्हणाले. या मतदारसंघात बेदखल कुळांचा प्रश्न मोठया प्रमाणात होता. मी पालकमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. या बेदखल कुळांसाठी अनेक कुणबी नेत्यांनी लढा दिला होता. त्यांच्या लढाईला बळ देत हा प्रश्न सोडवला. माझा त्यात फक्त खारीचा वाटा होता अशी स्पष्ट कबुली सुनिल तटकरे यांनी दिली.

या देशात ६५ वर्षे कॉंग्रेसने सत्ता केली. मात्र या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा दिन कधी कॉंग्रेसने साजरा केला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा केल्याचे सुनिल तटकरे यांनी कॉंग्रेसच्या आडमुठेपणावर प्रहार करताना सांगितले.

एनडीए सरकार आले आणि अल्पसंख्याक बहुल योजनेसाठी माझ्या मतदारसंघातील तालुका शोधला गेला त्यामध्ये मंडणगड तालुक्याचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून मंडणगडमध्ये अनेक विकासाच्या योजना आणल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. गुहागराला सीआरझेडचा जो प्रश्न सतावत आहे त्या कायद्यात बदल झालेला आहे. तरी हा प्रश्न प्रकर्षांने सोडविण्यासाठी मला संसदेत पाठवा नक्कीच हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा