Narendra Modi | भटके आत्मा स्वत:च्या पक्षाला आणि इतर लोकांनाही अस्थिर करतात, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा

Narendra Modi | पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), बारामती लोकसभेच्या सुनेत्रा पवार, शिरुर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ लोकसभेचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी शरद पवारांचा भटका आत्मा असा उल्लेख केला.

काही भटके आत्मे असतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, की ते भटकत राहतात. स्वत:ही समाधानी राहत नाहीत व इतरांनाही अस्थिर करत राहतात. महाराष्ट्रातील एका नेत्याने ४५ वर्षांपूर्वी हा अस्थिरतेचा खेळ सुरू केला. त्यांच्यामुळेच कितीतरी मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नाही. ते विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वत:च्या पक्षाला, पक्षातील लोकांनाही अस्थिर करतात. एवढेच नव्हे, तर स्वत:च्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण करतात. १९९५ मध्ये राज्यात सेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, हा भटकता आत्मा तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होता.

२०१९ मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीचनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या २५ ते ३० वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुयात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन