IPL 2024 | आरसीबीला नव्या मालकाला विकून टाका, सलग ६ पराभवांनंतर भडकला दिग्गज टेनिसपटू

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लाजिरवाणी कामगिरी कायम आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात आरसीबीला या मोसमातील सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. संघाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. संघाची सततची लाजिरवाणी कामगिरी पाहून महान टेनिसपटू महेश भूपती संतापला आहे.

भूपतीने आरसीबीला फटकारले (IPL 2024)
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर महेश भूपतीने त्याच्या X खात्यावर ट्विट केले, “क्रीडा, आयपीएल, चाहते आणि अगदी खेळाडूंच्या फायद्यासाठी, मला वाटते बीसीसीआयने आरसीबी संघ नवीन मालकाला विकला पाहिजे. आम्हाला नवीन मालकाची गरज आहे. इतर संघांप्रमाणे क्रीडा फ्रँचायझी तयार करण्याची कोण काळजी घेईल.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब