औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांचा पाठींबा घेणारे कोसळणार……वसुली सरकार बाय बाय !

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray government) संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. याशिवाय आणखी १० आमदार लवकरच माझ्यासोबत येणार आहेत. पण मला कोणावरही टीका करायची नाही. गुवाहाटी विमानतळावर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे शिंदे सोमवारी रात्री उशिरा शिवसेनेच्या काही आमदारांसह मुंबईहून निघाले होते. यानंतर त्यांनी गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकला. मात्र नंतर त्यांनी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मनसेचे नेते आमदार राजू पाटील (MNS leader MLA Raju Patil) यांनी एक ट्विट करतं महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांचा पाठींबा घेणारे कोसळणार……वसुली सरकार बाय बाय ! असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी #मविआ #वसुली_सरकार ह्या हॅशटॅगचा वापर केला आहे.