‘भुजबळ साहेबांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी केली अन् पवार साहेबांनी एका महिन्यात मान्य केली’

बीड : छगन भुजबळ साहेब यांचा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मधल्या काळात समाजावर जे संकट आलं त्या संकटामध्ये आपण सर्वांनी एक भूमिका घेतली आणि यातून मार्ग काढला आणि हा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला तो फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांनी मधल्या काळात ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले म्हणून महाविकास आघाडीवर टीका झाली मात्र हे आरक्षण ज्यांनी घालवले तेच लोक आज आमच्यावर टीका करत आहेत. या आरक्षणाची सत्यता, हा प्रश्न केंव्हा सुरू झाला, कोणाच्या काळात या प्रकरणाची केस सुरू झाली याचे पुरावे छगन भुजबळ यांनी मांडले होते. असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

बीड येथे महाविकास आघाडी सरकार बद्दल ‘कृतज्ञता मेळावा’ संपन्न झाला.यावेळी भुजबळ बोलत होते. या मेळाव्याला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर,आमदार संजय दौंड राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते.

मंडल आयोगासाठी भुजबळ साहेबांनी संघर्ष केला राज्यात मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेब होते. त्यावेळी भुजबळ साहेबांनी पवार साहेबांकडे मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली, आणि लगेच एक महिन्याच्या आत मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यामुळे फक्त अध्यादेश काढला म्हणून नाही तर ५५ वर्ष समाजकारणासाठी भुजबळ साहेब यांनी दिले आहेत यासाठी भुजबळ साहेब यांची कृतज्ञता व्यक्त करतो अश्या भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.

या काळात अनेक संकटे आली त्या संकटांच्या आम्ही सावली सारखे त्यांच्या सोबत होते अशी आठवण देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.यावेळी ॲड. सुभाष राऊत यांनी प्रास्ताविक केले तर बापूसाहेब भुजबळ, ईश्वर बाळबुधे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केले.

हे देखील पहा