Dharashiv LokSabha | नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको, राणाजगजीत सिंह यांची ओमराजेंवर टीका

Dharashiv LokSabha | नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको आहे. तर आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहील; जो ताकदीने धाराशिवसाठी निधी उपलब्ध करून देईल, जो मोठमोठ्या योजना आपल्या भागामध्ये घेऊन येईल. केंद्रातील विचारांचा खासदार आपल्या भागातून गेल्यास तो भरघोस निधी धाराशिवसाठी घेवून येईल. त्यासाठी अर्चना पाटील यांना मतदान करा, असे आवाहन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. तसेच विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या आमदार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, आई तुळजाभवानीच्या मंदिर विकासासाठी आपल्याला केंद्र सरकारचा निधी आवश्यक होता. आपल्या तुळजापूरच्या विकासासाठी हक्काचे पैसे केंद्र सरकार कडून मिळत असताना देखील, विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? एक ओळीचा प्रस्ताव देखील या खासदारांनी केंद्राकडे पाठवलेला नाही. पिक विम्याच्या बाबतीत आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो केंद्र सत्ता सरकारच्या अख्यारित्या विषय होता त्याबाबतीत या खासदारांनी काय केलं? हे प्रश्न मूलभूत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा