महाविकास आघाडी सरकार हे सडकं फळ आहे, ते पडायलाच हवं – उमा भारती

नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर (Eknath Shinde rebel) झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात (Uddhav Thackeray government is in crisis) सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपा नेत्यांनीही सरकारवर टीका सुरू ठेवलीच आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती (Senior BJP leader Uma Bharti) यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे सडकं फळ आहे, ते पडायलाच हवं. महाराष्ट्रात स्थापन झालेलं महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीनं स्थापन झालं आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे ते सरकार हे सडकं फळ आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं, हाच त्यांचा एकमेव हेतू होता.