पक्षाच्या कठीण काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष कधीही दूर करणार नाही – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे, मुंबई, सातारा शिक्षक संघटनेमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

मुंबई- सध्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या महाराष्ट्राचे चित्र काय आहे तुम्हाला माहीतच आहे. सध्या पक्षाच अडचणीचा काळ सुरू आहे. अडचणीच्या काळात जे पक्षाला साथ देतात त्यांच्या पाठीमागे पक्ष उभा असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस मधील रिक्त झालेल्या अनेक पदांवर नियुक्ती करणे सुरू आहे. त्यात तुमचा देखील समावेश करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil)  कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आज पुणे जिल्ह्यातील शिवाजी चंद्रकात खांडेकर संस्थापक अध्यक्ष शिवसमर्थ प्रतिष्ठान यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पक्षप्रवेश आज झाला आहे यांच्यासोबत मुंबई, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शिवाजी चंद्रकात खांडेकर हे पुण्यातील शिवसमर्थ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आहे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे काम आहे त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांच्या आजच्या पक्षप्रवेशाने शिक्षक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील इतर क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा धबधबा वाढेल यात काही शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रिक्त झालेल्या अनेक पदे भरणे सुरू आहे. त्यामध्ये निश्चितच शिवाजी खांडेकर यांच्यासोबत पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे संघटना वाढवण्याकरिता त्यांना जबाबदारी देण्यात येईल. आज इंडिया आघाडीची मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पूर्वनियोजन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक होती त्यामुळे मला पक्षप्रवेशाला याला वेळ झाला आहे. तरीसुद्धा आपण सर्वांजन मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहात

आज पुणे मुंबई सातारा जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये शिवाजी चंद्रकात खांडेकर राज्य जनरल सेक्रेटरी यांच्यासोबत अनिल माने, अध्यक्ष राज्य शिक्षणेतर मंडळ सातारा, संजय धमाळ, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, विनोद गोटे अध्यक्ष पुणे जिल्हा, गोवर्धन पांडूळ विभागीय सचिव पुणे जिल्हा विभाग, भानुदास दळवी सचिव नगर जिल्हा, प्रकाश शेळके मुंबई मुख्याध्यापक, आर. बी. पाटील मुंबई मुख्याध्यापक, सिद्राम कांबळे सचिव पुरंदर तालुका, प्रशोक बाणे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, किर्तीकुमार मेमाणे अध्यक्ष पुरंदर तालुका, राम भोसले कार्याध्यक्ष पुरंदर तालुका, दिवैद्र पारखे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षकतर संघटना, सुभाष तांबे पदाधिकारी पुणे जिल्हा, विजय खुडे पदाधिकारी सातारा, भानुदास काळ पदाधिकारी सातारा, विजय भोसले पदाधिकारी सातारा, संजय जगदाळे सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, अविनाश इंगावले सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, दत्तात्रय दूध सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, मनिष कुदळे सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, परशुराम कदम सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, अभिषेक गौतम सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, इम्तियाज सिद्दिकी सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड, अमित रमेश मोहिते सदस्य पिंपरी पिंपरी चिंचवड यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे.