Pune Crime | पुण्यात CEOP कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचे चोरून काढले व्हिडीओ, तरुणीच पाठवायची मित्रांना; दोघांना घेतलं ताब्यात

Pune Crime | पुण्यातील एका विद्यापीठात विद्यार्थिनींचे खासगी फोटो-व्हिडिओ लीक झाल्याची घटना समोर आली आहे. सीओईपी (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे) विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर हॉस्टेलमधील इतर मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या मित्रासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. आरोपी विद्यार्थीनीला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिला वसतिगृहातूनही हाकलून देण्यात आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 1 मेच्या रात्री वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी मिळून आरोपी मुलीची चौकशी केली. ती गुप्तपणे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचा त्यांना संशय होता. आरोपीच्या फोनमधून 900 हून अधिक फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत जे व्हॉट्सॲपवर दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केले होते. यामुळे वसतिगृहात चांगलाच गोंधळ उडाला.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, आरोपी आर्या गिरीश काळे हिने हॉस्टेलमध्ये चोरून विद्यार्थीनींचे व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. विद्यार्थीनींच्या व्हिडीओचा गैरवापर केल्याची माहिती समोर येतेय. दोघांनी मिळून अनेक विद्यार्थीनींचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी आर्या आणि विनीत यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आलाय.

या प्रकरणी सीईओपी प्रशासनाने चौकशी सुरू केलीय. तसंच पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आलीय. ज्या विद्यार्थीनीविरुद्ध तक्रार देण्यात आलीय तिला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबीत करण्यात आल्याचंही सीईओपी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन