वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात लावा ‘ हि ‘ रोपे

योग्य दिशेला रोप ठेवल्याने मिळेल सुख-समृद्धी

१ . घरातील तुळशीचे रोप ‘वास्तू’साठी लाभदायी !
घरात तुळशीची रोपे ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते . घरात तुळशीचे रोप असल्यास, ते अनेक वास्तूदोष दूर करते.

Nitin Markale : 2019

२. घरात एकतरी ‘मनी प्लांट’ असावा ! – घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने लावली पाहिजे. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा, आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते, असे मानले जाते.

अगर आप ने भी घर में लगा रखा है मनी प्लांट तो हो जाइये सावधान, वरना हो जायेंगे कंगाल - Breaking Tube

३ . घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे ठेवू नये. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. घरात ‘कॅक्टस’ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात, असे म्हटले जाते. घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

Vastu Tips: आपको कंगाल बना सकती हैं आपकी ही ये 8 गलतियां! - these 8 mistakes can make you a pauper-mobile

४ . घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली, तर आर्थिक परिस्थिती सुधारते.

५ . फेंगशुई नुसार घरात बांबूचे छोटे झाड देखील बरकत आणते . ते खरेदी करताना तीन लेयर लाल रिबीन ने बांधलेले असायला हवेत .

Make the Right Placement of Bamboo Plant as per Vastu

६ . घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात.

७ . घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास, घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते.

८ . घरात पिंपळाचे झाड लावू नका – घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते, असे म्हटले जाते.