अंकिता लोखंडेने सर्वांपुढे पतीला चप्पल फेकून मारली, व्हिडिओ आला समोर

Ankita Lokhande Threw Slipper At Husband: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे बिग बॉसच्या 17व्या (Big Boss Season 17) सिझनमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धकांना घरात एकत्र राहून अद्याप 24 ताससुद्धा झाले नाहीत आणि त्यांच्यात आपापसांत भांडणं सुरू झाली आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या पतीला चक्क चप्पल फेकून मारल्याचे दिसत आहे.

बिग बॉसच्या या नव्या प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. यादरम्यान एक सीन दाखवण्यात आला आहे, जिथे अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे एकमेकांशी बोलत आहेत. हे दोघं स्पर्धकांच्या बदललेल्या रुम्सविषयी चर्चा करत असतात. त्यानंतर बिग बॉस सर्वांसमोर विकी जैनला सुनावतो. “जर तुला डोकं चालवायची आणि दाखवण्याची इतकी हौस असेल तर तू अंकिताच्या मागे मागे रुम नंबर 1 मध्ये का थांबलास? तू रुम नंबर 2 मध्ये जा, डोकं चालवणाऱ्यांसाठीच ती रुम आहे”, असं बिग बॉस विकीला सुनावतो.

https://www.instagram.com/reel/CycfGMrvFjs/?utm_source=ig_web_copy_link

रुम बदलल्याने विकी रात्रभर झोपू शकला नव्हता. तर अंकिता सतत त्याला मदतीसाठी बोलवताना दिसली. मात्र विकी अंकिताकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर विकी अंकिताला विचारतो की माझं जॅकेट कुठे आहे? याचं उत्तर देताना अंकिता अडखळत बोलते आणि विकी तिची खिल्ली उडवतो. हे पाहून अंकिता थेट त्याच्यावर चप्पल भिरकावते. यानंतरही विकी थांबत नाही. तो अंकिताची मस्करी करतो. “या देशात पतीची काय अवस्था आहे, ते पहा”, असं तो कॅमेरासमोर म्हणतो.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?