कुणाला काही शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका; नरेंद्र मोदींचा राहुल गांधीना टोला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केले. या भाषणात त्यांनी कॉंग्रेसवर सडाडून टीका केली. तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं देखील कौतुक केलं. तुम्हाला काही शिकता येईल तर ते शरद पवार यांच्याकडून शिका, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मागील दोन दिवसांपासून त्यांनी कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. सत्तेत बसलो म्हणजे देशाची चिंता करायची आणि विरोधी पक्षांच्या खुर्चीवर बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही का? असं बोलून त्यांनी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

कोणाकडून काही तरी शिकता येत नसेल तर त्यांनी पवारांकडून शिका. या वयात देखील ते अनेक आजारांशी लढत आहे. परंतु तरीदेखील ते आपल्या मतदारसंघातील लोकांना सतत प्रेरणा देत आहेत. जर तुम्ही नाराज असेल तर तुमच्या मतदारसंघातील जनता देखील तुमच्या वर नाराज होतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कोरोना काळात देशातील राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या २३ बैठका घेतल्या होत्या. मात्र काही मुख्यमंत्र्यांनी या बैठकांवर बहिष्कार टाकला. कोरोनाचं संकट संपूर्ण मानव जातीवर आलं आहे. त्यामुळे काही लोकांनी याबाबत आत्मचिंतन करावं. शरद पवारांनी या बैठकांना आवर्जून हजेरी लावली होती. तसेच याकाळात आयुष मंत्रालयाने देखील चांगल काम केले आहे, असं देखील मोदी म्हणाले.