दडपशाहीचे राजकारणा करणाऱ्यावर २०२४ ला सर्जिकल स्ट्राईक; सतीश घाटगेंची डरकाळी

घनसावंगी: माझी कर्मभूमी घनसावंगी असून इथल्या मातीला सुजलाम-सुफलाम आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. कुरुक्षेत्राच्या युद्धात कोण कुठला याला महत्व नसते. २०२४ च्या लढाईत समोर येऊन ताकत दाखवा. २५ वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनाच काय झाल. याचा हिशोब द्या.अशा शब्दात समृद्धी शुगर्सचे चेअरमन तथा घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख सतीश घाटगे (satish Ghatage )यांनी नाव न घेता राजेश टोपेंवर हल्ला चढवला.घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे भाजपच्या १३५ व्या शाखेचे बुधवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

भाजप युवा नेते विश्वजीत खरात,भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, डॉ. रमेश तारगे, शिंदे साहेब, पांडूरंग भांगे, शिवाजीराव कंटूले, ईश्वर धाईत,अभिजित उढाण,विकी शिंदे,कृष्णा सागडे, सुदर्शन राऊत, सुनील भोजने,सुनील पोकळे, सतीश महाराज जाधव, डॉ. गजानन ढेरे, राजकुमार उगले प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यात किसन उगले,खंडू उगले,प्रल्हाद उगले,उद्धव उगले,नारायण भुसारे,पाराजी गायकवाड,बाळू उगले,रघुनाथ उगले,विलास उगले,विनोद उगले,सोपान उगले,किशोर उगले,भारत उगले,दत्ता उगले,रामेश्वर उगले,तुकाराम उगले,भगवान उगले,शिवाजी उगले आदीचा समावेश आहे.

दडपशाहीचे राजकारणा करणाऱ्यावर २०२४ ला सर्जिकल स्ट्राईक
प्रसिद्धीपत्रकानुसार, अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून सतीश घाटगे यांनी जीरडगावच्या शेतकरी व युवकांशी संवाद साधला. एक्स्प्रेस कॅनॉलची मूळ संकल्पना माझी असून त्याचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट मी तयार केलेला आहे.परंतु,प्रस्थापित राजकारण्यांनी ती संकल्पना चोरली, गस इंजिनियर पाठवून सर्व्हे करून जनतेची दिशाभूल केली. त्यामधील सर्व तांत्रिक बाबी मला माहिती आहे. ही कल्पना चोरणाऱ्यानी समोर चर्चेला येण्याच आव्हान सतीश घाटगे यांनी यावेळी केले. प्रस्थापितांनी राजकारणासाठी पळवाटा न शोधता समोर येऊन विकासावर बोलावे.असे आव्हान त्यांनी केले. तसेच २०२४ च्या निवडणुकीच्या माध्यमातून दडपशाहीचे राजकारणा करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन जनतेला केले.

घनसावंगी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी हीच खरी वेळ: विश्वजित खरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे चित्र बदलत आहेत. गरिबांना खर्या अर्थाने न्याय मिळत आहे.सतीश घाटगे यांच्या रूपाने घनसावंगी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना नवे रत्न मिळाले आहे.उसाला सर्वाधिक भाव देण्याबरोबरच शेतकऱ्यांना मान आणि सन्मान समृद्धी कारखान्याने दिला आहे. त्यामुळे आपल्या गावाचे , तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आता खरी वेळ आहे. सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे विश्वजित खरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.