थेरगाव क्वीनचा माज काही उतरेना; आता तर चक्क पोलिसांनाच दिलं खुल आव्हान !

पिंपरी : समाज माध्यमांवर अश्लील शब्दात शिव्या आणि धमक्या देणारे व्हिडीओ तयार करणारी थेरगाव क्वीनला पोलिसांनी समज दिल्यानंतरही तिचा माज काही उतरेना. आता तर चक्क एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने पोलिसांनाच चँलेंज दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पिंपरी चिंचवड भागात राहणारी साक्षी श्रीमल हिने ‘थेरगाव क्वीन’ या नावाने सोशल मीडियावर अकाऊंट तयार केले आहे. तिच्या सोबत साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे तिघेजण सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अश्लील शिव्यांचा व्हिडीओ तयार करून अपलोड करीत होते. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांना समज दिली होती. तसेच या तिघांनी यापूढे असले व्हिडीओ बनवणार नाही, असंही सांगितलं होतं. मात्र थेरगाव क्वीन चा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने पोलिसांना उद्देशून म्हटलं आहे.

मोठी हस्ती आहे आपण. तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालनं किती पण दगडं मारू द्या. आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं. अख्खा ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो. असं गाणं त्या व्हिडीओच्या मागे दिलं आहे. यामध्ये तिने चक्क पोलिसांनाच खुलं आव्हान दिले आहे.

https://www.instagram.com/reel/CZmM3Kag6LO/?utm_medium=copy_link

सोशल मिडियावर या तिघांनी ‘थेरगाव क्वीन’ म्हणून इन्टाग्रामवर अकाउंट तयार केले होते. त्यावर हे तिघं प्रसिद्धीसाठी शिव्या आणि धमकी देणारे व्हिडीओ तयार करून ते यावर अपलोड करीत असे. पिंपरी चिंचवड येथील पोलिसांना हे समजताच साक्षी महाले आणि साक्षी कश्यप हिला अटक केली होती. त्याचं पोलिसांनी समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर या दोघींचा साथीदार कुणाल कांबळेला देखील पोलिसांनी अटक केली होती.