Balasaheb Ambedkar | गेल्या 10 वर्षात 84 हजार शेतकरी, शेतमजूरांच्या आत्महत्या; बाळासाहेब आंबेडकरांचा मोदी व मविआवर घणाघात

Balasaheb Ambedkar | गेल्या १० वर्षात देशातील ८४ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही. यापैकी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मोदीने किती मदत दिली याची माहिती द्यावी असे अँड. बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी घणाघात केला. ते वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, उमेदवार अशोक हिंगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान यांचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय असताना हे वसुलीचे कार्यलाय झालं, राजकारणात नीतिमत्ता ची फार मोठी किंमत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात कुठेही नीतिमत्ता दिसत नाही असं म्हणत महायुतीवर निशाण साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बांधिलकी नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो त्याच्या फायद्यासाठी काम करणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला.

मोदी असं म्हणतात माझ्या कालावधीत काहीच करप्शन झालं नाही काँग्रेसवल्यानी लिस्ट काढली त्या लिस्ट मध्ये किती ठिकाणी कारप्शन झालं याची लिस्ट काँग्रेसवाल्यानी दिली ती अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेसमोर वाचून दाखवली. महागाई बरोबर बेरोजगारी वाढली, मोदींमुळे सगळं देशोधडीला लागले, हे चोरांचे, व्यापाराचे, लुटारांचे सरकार आहे.

इथले शासन राज्य करण्यासाठी नाही तर तोडमोड करण्यासाठी आहे .मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण साठी राजकीय भूमिका घेणं अवघड झालं. इथल्या गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे. शरद पवारांना देखील मी भूमिका घेण्यासाठी सांगितले होते असं ऍड.आंबेडकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय