आचारसंहितेचा भंग करणाऱ्या माजी आमदाराचा या लेडी सिंघने उतरविला माज

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांचे नेते निवडणूक रॅली आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या प्रचारात गुंतले आहेत. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी यूपीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. पण, बुलंदशहरच्या दिबई येथील दबंग माजी आमदार आणि सपा नेते गुड्डू पंडित यांना आचारसंहितेचा विसर पडला असावा.

आचारसंहितेचा भंग करताना भगवान शर्मा उर्फ  गुड्डू पंडित पकडले गेल्यावर त्यांचा कोणताही युक्तिवाद चालला नाही. मंडळ अधिकारी वंदना शर्मा यांनी त्यांना आचारसंहितेचा अर्थ समजावून सांगितला आणि त्यांच्या वाहनातून पक्षाचे झेंडे काढून घेतले. यूपीमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस कारवाईत आहेत. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, रात्री माजी आमदार गुड्डू पंडित त्यांच्या सरकारी वाहनांवर आणि वाहनांमध्ये समाजवादी पक्षाचा झेंडा घेऊन फिरत होते.

बुलंदशहरच्या दिबई विधानसभा मतदारसंघात गुड्डू पंडित यांची मजबूत पकड आहे. सर्कल ऑफिसर वंदना शर्मा यांनी गुड्डू पंडित आणि त्यांच्या ताफ्याला पाहिले तेव्हा त्यांनी लगेचच कारवाई केली. त्यांनी गुड्डू पंडित आणि त्यांच्या ताफ्यातील सर्व वाहनांना थांबण्यास सांगितले. गुड्डू पंडित बोलायला पुढे गेल्यावर सीओने त्यांना स्पष्ट सांगितले की, आधी झेंडे काढा आणि मग बोला.

10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत निवडणुका

निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यूपीमध्ये 403 विधानसभा जागांसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.