Priyanka Chaturvedi | “श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, माझे वडील गद्दार आहेत”, प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेने राजकारण तापले

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेच्या उद्धव गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या विधानाने महाराष्ट्रात राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईतील प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबाबत तिखट वक्तव्य केल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबईच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उद्धव गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे, माझे वडील गद्दार आहेत. कोण आहेत एकनाथ शिंदे? देशद्रोही. हा आवाज ठाण्यात पोहोचला पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

यावेळी प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील एका संवादाचे उदाहरण दिले. दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातावर लिहिले आहे- मेरा बाप चोर है. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे- माझे वडील गद्दार आहेत. आता प्रियांका चतुर्वेदींच्या या विधानावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती