Ajit Pawar | खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या कोल्हेंना मीच थांबविले, आता हाच बाबा..; अजितदादांचा टोला

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर आगपाखड केली आहे.

“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन