Samsung ने भारतात लॉन्च केला Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

पुणे – Samsung ने आज भारतात आपला पहिला 2022 फ्लॅगशिप Galaxy S21 FE 5G लॉन्च केला आहे. Samsung Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल कॅमेरे, 120Hz रिफ्रेश रेट आणि Android 12 सारख्या वैशिष्ट्यांसह येतो. Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे, तर फोनच्या 8GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 53,999 रुपये आहे.

हा स्मार्टफोन 11 जानेवारी 2022 पासून Samsung.com, Amazon.in या प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.फोनच्या खरेदीवर सवलत ऑफर 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2022 पर्यंत वैध असेल. फोनमध्ये सुपर स्ट्राँग कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट देण्यात आला आहे. Galaxy S21 FE 5G स्लीक आणि स्लिम डिझाइनमध्ये येतो. त्याची जाडी 7.9 मिमी आहे.Samsung Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

त्याच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स, 12-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहेत. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. इमर्सिव्ह अनुभवासाठी मागील कॅमेरामध्ये ड्युअल रेकॉर्डिंग, पोर्ट्रेट मोड, एन्हांस्ड नाईट मोड आणि 30X स्पेस झूम सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच फुल एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनमध्ये 5nm आधारित ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

हा फोन Android 12 आधारित One UI 4 वर काम करतो. या फोनला IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंग आहे.फोन 4,500mAh बॅटरी सपोर्टसह येतो. जे 25W वायर्ड, 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन ऑलिव्ह, लॅव्हेंडर, व्हाईट आणि ग्रेफाइट या चार उत्तम रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.