Ajit Pawar | एकमेकांत भांडून बारामतीचा विकास होणार नाही म्हणून सर्व विरोधक एकत्र आलोय

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या टप्यात असलेल्या ११ लोकसभा मतदारसंघांचा प्रचार रविवारी थंडावला.  देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेवटची प्रचार सभा घेतली, यावेळी तूफान फटकेबाजी करत ”बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना विजयी करा,” असे आवाहन केले आणि  भावनिक न होता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, राज्याच्या निधीला केंद्राची जोड मिळाल्यास विकासाला गती येईल, हा विचार नजरेसमोर ठेवून निर्णय घ्या, असेही त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ  बारामतीमधील मिशन ग्राउंडवर महायुतीची  सांगता सभा झाली. त्यावेळी अजित पवार  बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, एकमेकांत भांडून उपयोग होणार नाही, बारामतीचा विकास होत नाही, हे लक्षात आल्याने सर्व विरोधक एकत्र आलो आहोत.  बारामती, इंदापूर, पुरंदरसह लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहोत, तसेच बारामती परिसरातील  जिराईत शब्दाचे रूपांतर बागायती शब्दात करण्याचा आमचा निर्धार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील शेती, पाणी, रेल्वे, विमानतळ, मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याचा शब्द मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.

आपल्यावर टीका करणाऱ्यांना पळता भुई थोडी होईल असे सांगत अजित पवार म्हणाले,  “फार उड्या मारू नका, निवडणूक औटघटकेचीच आहे. निवडणूक झाल्यावर यातला एकही जण येथे दिसणार नाही. नंतर तुम्ही आणि मीच येथे असणार आहोत. तसेच वडिलधाऱ्यांबद्दल कायमच आदर होता, आजही आहे.  शरद पवार नाव न घेता  आयुष्यात एकही कुस्ती न खेळलेले कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, त्यांना डाव तरी माहिती आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार