Porsche car Accident | “माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी..”, पुणे हिट अँड रन प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
![Porsche car Accident | "माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी..", वेदांत अग्रवाल प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया](https://i0.wp.com/azadmarathi.com/wp-content/uploads/2024/05/ajit-pawar-10.webp?resize=750%2C400&ssl=1)
पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Porsche car Accident ) यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले. मात्र टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचं म्हटलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांना फोन करत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश दिले आहेत.
पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते, असं अजित पवार म्हणाले. अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेशही पवारांनी दिले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Porsche Car Accident | मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पोलीस आयुक्तांना फोन
Vijay Wadettiwar | दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी करा
Ashish Shelar | महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं