राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, पण कारण काय?

मुंबई- बी टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीबद्दल (Adil Khan Durrani) मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खान दुर्राणीला ताब्यात (Adil Khan Durrani Detained) घेतले आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खानवर ही कारवाई केली आहे.

राखी सावंतने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पतीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सुनावणी करताना आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

राखीचा पती आदिल खानला ताब्यात घेतले
खरं तर, काल रात्री राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीबद्दल (Rakhi sawant Husband Adil Khan Durrani) अनेक खुलासे केले आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आदिलविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना राखी सावंतने आदिलने तिच्याकडून पैसे आणि दागिने घेतल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंतने असेही सांगितले आहे की, आदिल तिच्यावर अत्याचार करतो. तसेच राखीने आदिल खानचे दुसर्‍या मुलीसोबत एक्स्ट्रा मटेरियल अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणाबाबत डीसीपी झोन ​​9 अनिल पारसकर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, राखी सावंत यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत आहोत, आदिलला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राखी सावंतसोबत लग्न करून नंतर माघार घेणाऱ्या आदिल दुर्राणीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राखीने आदिलवर अनेक आरोप केले
नुकतीच आदिल खान दुर्राणीसोबत लग्न करणारी राखी सावंत तिच्या लग्नापासूनच चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून राखी आपले वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याचा दावा करत आहे. पती आदिलने तिची फसवणूक केली असून त्याचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचे राखीने म्हटले आहे.