Hasan Mushrif | अर्चना पाटील यांना अल्पसंख्याक समाजाचे पाठबळ, हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास

Hasan Mushrif | लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचाराचा समारोप झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता अल्पसंख्याक समाजाचा विकास केला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना  पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथे अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी  मुश्रीफ बोलत होते. मेळाव्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना  हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील जनता आपल्याला चांगली ओळखते. आपण कधीही समाजामध्ये भेदभाव केला नाही. मुस्लिम बहुल भागात व जिथे गरज आहे, अशा दोन्ही जागी शादीखान्यासाठी आपण प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले आहेत. शेतीमुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी जास्त आहे, त्याला हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो. केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे. आपल्या लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी मोदी सरकारच्या विचारसरणीला अनुकूल लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार