Praful Patel | देशाच्या विकासासाठी भाजपाबरोबर जायला पाहिजे असं कोल्हे म्हणाले होते, प्रफुल पटेल यांचा खुलासा

Praful Patel | लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.  या देशाचा विकास कोणी केला तर मोदींनी. त्यामुळे भाजपसोबत आपल्याला जायला पाहिजे असे म्हणणारा अचानक कसा पलटला, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) टीकास्त्र सोडले.

महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ मंचर येथे आयोजित प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल  बोलत होते. आमदार अतुल बेनके,  देवेंद्र शहा, भीबाळासाहेब बेंडे, विष्णूकाका हिंगे, मानसिंग पाचुंदकर,  विवेक वळसे पाटील, अरुण गिरे,  मंगलदास बांदल, अपूर्व आढळराव, पूर्वा वळसे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर या सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल  म्हणाले की, खासदार झाल्यावर तीन वर्षांनी अमोल कोल्हे माझ्याकडे आले. म्हणाले मला खासदार रहायचं नाही, लोकांना वेळ देता येत नाही. नंतर या देशाचा विकास कोण करु शकेल तर नरेंद्र मोदी. असे सांगून आपल्याला भाजपबरोबर जायला पाहिजे असंही म्हणाले होते. जे दोन जुलैला अजितदादांच्या शपथविधीला आले, अॅफिडेवटवर सही केली आणि नंतर दुसरीकडे गेले, असा एका ठिकाणी स्थिर नसणारा माणूस आपल्या कामाचा नसतो, अशा शब्दांत त्यांनी कोल्हेवर सडकून टीका केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा