बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी किरीट सोमय्यांशी बोललो नाही – रामदास कदम

मुंबई : कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन रामदास कदम यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या ऑडिओ क्लीपमध्ये शिवसेनेचा उल्लेख नाही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी किरीट सोमय्यांशी बोललो नाही असा खुलासा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. तर, मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलं आहे ते किती चुकीचं आहे त्याची बाजू मांडण्यासाठी आज पुढे आलोय अस रामदास कदम म्हणाले आहेत.

कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचं नेतृत्व नाराज असल्याचं दिसून आलं. भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्याला खतपाणी देण्याचं काम रामदास कदम यांनी केले असल्याचा आरोप झाला. इतकचं नाही तर रामदास कदमांची एक ऑडिओ क्लीप बाहेर आली होती. यात अनिल परबांवर जी कारवाई झाली त्यावर आनंद व्यक्त करताना दिसत होते. मात्र या ऑडिओ क्लीपमधील आवाज आपला नसल्याचा दावा रामदास कदमांनी केला.

दरम्यान, अलीकडेच दापोली नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने पक्षाची शिस्त पाळली नाही, असे कारण देत शिवसेनेच्या तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, चार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारळ देण्यात आलेले तीनही पदाधिकारी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले आहेत आणि नियुक्त झालेले चारही नवीन पदाधिकारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी जवळीक असलेले आहेत. या नव्या घडामोडींमुळे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी रामदास कदम, योगेश कदम यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे, असे मानले जात होते.