Chhagan Bhujbal | महायुती धर्माचे पालन करून उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, भुजबळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुती धर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या.

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्य मंत्री खासदार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज येवला कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, हरिश्चंद्र भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भोलानाथ लोणारी, शहराध्यक्ष दीपक लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, मोहन शेलार, दत्तूपंत डुकरे, दत्तात्रय रायते, सचिन दरेकर, शिवाजी सुपनर, प्रा. ज्ञानेश्र्वर दराडे, डॉ.क्षत्रिय, डॉ.जाधव, बाळासाहेब पुंड, गोरख शिंदे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, गणपत कांदळकर, भागिनाथ पगारे, मच्छिंद्र थोरात, पांडुरंग राऊत, विलास गोरे, मंगेश गवळी, जयंत साळी, राहुल डूमरे, महेंद्र पुंड, मोहसीन शेख, सोहील मोमीन, गोरख शिंदे, आनंदा नागरे, कैलास नागरे, शांताराम नागरे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, डॉ.प्रवीण बुल्हे, भूषण लाघवे, गोटू मांजरे, विकी बिवाल, मलिक मेंबर, विशाल परदेशी, विजय जेजुरकर, संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला विधानसभा मतदार संघात विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लागले आहे. तसेच पाणी पुरवठा योजना, जलसिंचनाचे प्रकल्प, पर्यटन, रस्ते यासह अनेक महत्त्वाची कामे प्रगतीपथावर आहे. येवल्याच्या विकासाची ही कामे अविरत सुरू राहील. येवला टँकर मुक्त करण्यासाठी अनेक पाणी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. येवल्याच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबध्द असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही विधानसभेचीच निवडणूक असल्याचे डोळ्यासमोर ठेऊन काम करावे असे आवाहन त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

ते म्हणाले की, कांद्याचा प्रश्न हा सध्या अतिशय ज्वलंत प्रश्न बनला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. कांदा प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा निघावा यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे. शासनाकडून शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बूथ यंत्रणा करण्यात येऊन आपल्या पक्षाची यंत्रणा यशस्वी पणे राबविण्यात यावी. महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवून हातात हात घेऊन एकत्रित चर्चा करून काम करावे. शहरातील पदाधिकाऱ्यांनी शहराची तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या गावाची जबाबदारी घेऊन काम करावे. महिलांनी देखील आपलं महत्वपूर्ण योगदान द्यावे. तसेच महायुतीतील घटकांची एकी तुटता कामा नये असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा